Ads

Wednesday, July 18, 2018

राज-कारण मुक्या प्राण्यांचे...

राज-कारण मुक्या प्राण्यांचे...

आज एकद चर्चेत असलेला विषय निवडला आहे पण त्य आधी एक गोष्ट सांगू ईच्छीतो ते म्हणजे शिर्षकामधील मुके प्राणी म्हणजे फक्त आणि फक्त गाई,गुरे नव्हे तर तो शब्द केवळ काही समाजकंटकांनी भडकावू भाषणे केली की एखादा अणु विस्पोट व्हावा असे पेटून उठणाऱ्यांसाठी वापरला आहे.
सध्या महाराष्ट्र राज्याची स्थीती पाहता आज प्रत्येक राजकारण्यांना एकच प्रश्न मला विचारावसा वाटतो तो म्हणजे ,"आत्ता का?" म्हणजे अगदी ताजाच प्रश्न घेवू दुधाचा!दर वाठ जर आधीच केली असती किंवा त्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आधीच सोडवले असते तर आज ही वेळ आली असती का वो?हा विचार पेटुन उठणारा कार्यकर्ता कधीच करत नाही. कार्यकर्ता हा एक असा व्यक्ती असतो जो स्वत:च्या सख्या बापाच कमी पण त्या त्याच्या दिड दमडीच्या साहेबाच ऐकत असतो.असो तो आपला विषय नाही.
आज दोन दिवस झाले साधारणत: शेकडो लिटर दुध आज काही मुर्ख माणसांनी रस्त्यावर अक्षरश: फेकून दिले.अगदी दुरदर्शन वर बातमी पाहतानाही तुळतुळ वाटते.मुळात पाहायच झालंच तर वरी वापरलेला मुर्ख हा शब्द त्या दुध वाया घालणाऱ्या लोकांना वापरणे योग्य नाही होणार कारण हे सगळ कारस्थान हे त्यांच्या नेत्यांचेच आहे त्यामुळे त्या त्या नेत्यांनाच शिव्या द्याव्यात. दुसरा मुद्दा असा की प्रश्न हे चर्चेने सोडवता येतातच,बर ते ही नाही शक्य झाले तर सगळ्यांना घेवून जाब विचारू शकतो आपण,बरं ते ही नाही जमलचं तर तुम्ही दुध गरीबांत वाटून त्याचा निशेध करू शकता ना? हे प्रश्न त्या व्यक्तींना का पडत नसतील? देवच जाणो.
बरं आजून एक ऐनवेळी टिवटिव करणारे फुरोगामी शंकरावर अभिषेक केला की कुञं भुंकल्यागत भुंकणारे जेंव्हा रस्त्यांवर दुधाचा अभिषेक होतो तेंव्हा का शेपुट घालून बसतात ते कळत नाही ब्याँ.
आजुन एक विषय सध्या चालू आहे जो असा की मुलांना पहिलीत 5 व्या वर्षी पाठवणे अवश्यक करावे त्या वर सरकारने निर्णय दिला की ,"मुलांना लहाणपण जगू द्या."ह्या सगळ्यात ज्या महाशयांनी तो निर्णय मांडला होता की 5 वर्ष करावे ह्यांना एवढं देखील कळत नाही का,की आख्या हिंदुस्तानात आज एन.सी.ई.आर.टी. चा अभ्यासक्रम लागू आहे तिथे आपल्या राज्यात फक्त 12वी ला 5-10 मार्क घ्या व पास व्हा हा प्रकार बदलावा अस कधीच ह्यांना वाटलं नाही का? दुसरे म्हणजे आपल्या ईथे एक येडं लागलेल आहे ते म्हणजे मुलांना पुस्तकी किडा बनवून सोडायचे आणि प्रात्यक्षीत माहीती काहीच म्हणम्या पैक्षा थोडीच द्यायची आता त्या पुस्तकी माहीती येणार आहे का पुढे कामाला? हे प्रश्न आजच्या राजकारण्यांना कधीच पडत नाहीत.कारण ह्यांना फक्त आणि फक्त विकास करायचा आहे नाही असे मी म्हटलोच नाही पण तो फक्त व फक्त स्वत:चाच आणि ह्याना आपला कार्यकर्ता एकदम जीव लावून मदत करतो त्या बदल्यात त्याला मिळत काय ह्याचा विचार सगळ्यांनीच करायला हवा...

No comments:

Post a Comment

"आठवणील पठाणकोट एअर फोर्स स्टेशन"

  31 डिसेंबर 2015 त्यादिवशीही एकीकडे संपूर्ण देश नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे एक मोठे संकट नवीन वर्षाच्या...