Ads

Monday, May 28, 2018

सावरकर जांना समजले नाहीत!

सावरकर जांना समजले नाहीत


         खरे पहायचे झाले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिण्यासाठी माझी तेवढी लायकी नाही कारण ह्या जगात सावरकरांवर अनेक अभ्यासू व्यक्ती अशा आहेत की जे सावरकरांना माझ्यापेक्षा जास्त ओळखत असतील किंवा त्यांनी सावरकरांना माझ्यापेक्षा जास्त अभ्यासले असतील म्हणून आज सावरकरांवर लिहिण्याची इच्छा नव्हती पण थोड्या वेळापूर्वीच कोणत्यातरी इसमाने एक ब्लॉग पोस्ट केला शीर्षक होते "सावरकरांच्या नावापुढे वीर लावणे कितपत बरोबर'' (शिर्षक हे मुळ हिंदीमध्ये असून मी त्याचा मराठी अनुवाद केला आहे)
       लेख वाचायला सुरुवात केली खरी पण, दोन-चार पॅरेग्राफ वाचले व लेखकाच्या बुद्धीचा अंदाज साधारणता समजला व वाचन सोडून दिले त्या लेखकाशी विरोध म्हणून किंवा सावरकरांवरील प्रेम म्हणून नव्हे तर एक साधारण हिंदुस्थानातील नागरिक म्हणून आजचा विचार मांडत आहे.  
       इसवी सन 1883 मध्ये जन्मलेल्या सावरकरांवर आजपर्यंत अनेक आरोप लावले जातात. आता सगळ्याच आरोपांचे खंडन किंवा स्पष्टीकरण देत बसायचे झाले तर वाचक म्हणतील की,"खूप मोठ लिहितो!ह्याचे ब्लॉग वाचणे म्हणजे भुशातून सुई शोधण्यासारखे होईल."त्यामुळे काही निवडक आरोपांचे स्पष्टीकरण अगदी थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करेल

       सावरकरांवर सर्वप्रथम आरोप केला जातो की ते गांधीवादाचे सूत्रधार होते. सावरकर विरोधी लोक सावरकरांना गांधी वधाचा सूत्रधार म्हणतात का ते पाहू. जेव्हा नथुराम गोडसे गांधींचा वध करण्यासाठी निघाले त्याआधी त्यांनी सावरकरांचे दर्शन घेतल्यामुळे (दर्शन म्हणजे आशीर्वाद थोडक्यात).
 माझा  ह्या अशा विचारांच्या माणसांना अगदी छोटासा प्रश्न आहे. तो असा की  तुम्ही सगळ्यांनीच आत्तापर्यंतच्या आयुष्यात कुठली ना कुठली परीक्षा दिली असेल ना? त्यासाठी जाण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्यांचा पाया तर तुम्ही पडलात असाल ना ? आणि योगायोग तुम्ही त्या परीक्षेत नापास झालात!चला अगदीच काठावर पास झालात तर तोंड वर करून म्हणता का बापाच्या पाया पडलो म्हणून असे झाले? बरं तरी तुमच्या वडिलांना त्या विषयाबद्दल कितपत माहिती असते?
          हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा म्हणजे स्वतः नथुरामांचे  न्यायालयातील स्टेटमेंट तुमच्यापैकी किती जणांनी वाचले आहे? त्यात त्यांनी स्वच्छ भाषेत सांगितले आहे की तात्यारावांचा म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ह्या कटामध्ये काहीही हात नव्हता...

       आता वळूयात दुसऱ्या आरोपाकडे सर विल्यम कर्झन वायली यांची हत्या मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये 1 जुलै 1909 मध्ये केली. जॅक्शन हत्या प्रकरणात देखील त्यांनाच दोषी  मानल जात. असे अनेक हत्याकांड त्यांच्या नावाने रजिस्टर केले जातात . त्यासाठी एकच विचार या ठिकाणी म्हणतो,जेव्हा तुमच्या देशातील सैनिकाला दुसऱ्या देशातील  सैनिक गोळी मारण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला मरणाच्या दारी नेतो तेव्हा एक खरा देशभक्त दुसऱ्या दिवशी त्याचा बदला म्हणून त्या दुसऱ्या सैनिकांवर गोळीबार करतो व त्यास मरणाच्या दारी नेतो यात आपल्या सैनिक चुकीचे करतो का? त्याचप्रमाणे इंग्रज कोण होते याचा विचार आपण करायला पाहिजे. अहो एवढेच काय आज जर सख्ख्या भावाने वाटणीतील जमिनीचा एक तुकडा जास्त घेतला तर त्याला मारायला उठतात.इंग्रज तर दुसरीच गोष्ट झाली ना मग.स्वतःच्या मातृभूमीसाठी  शस्त्र उचलले तर काय वाईट केलं?


       अजून एक आरोप सावरकरांवर लावला जातो तो म्हणजे ते माफीवीर होते.  त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवले आहेत. आता तुम्हाला savarkar नावाची कावीळ झाली असेल तर, त्याला मी काही करू शकत नाही.  कारण त्यांना जेंव्हा अंदमानातून रत्नागिरीत आणलं गेलं.  तेव्हा एका अटीवर आणले गेले . ती अट म्हणजे "तुम्हाला काही दिवस स्थानबद्धतेत राहावे लागेल" ,म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर "नजर कैदेत" आणि असे असताना तुम्ही हिंदुस्थानच्या राजकारणात भाग घेणार नाही. (अर्थातच ही गोष्ट फक्त आणि फक्त स्थानबद्धतेत असतानाच बर का ). आता त्यांना माफीवीर तेव्हाच म्हणावे लागेल जेव्हा ते  स्थानबद्धतेतुन मूक्त झाल्यावर देखील, वरील म्हणणे ऐकले . तेव्हाच वरचा आरोप  खरा ठरेल ना? स्थानबद्धतेतुन  सुटका झाल्यावर परत सावरकरांनी राजकारणात उडी घेतली आहे.  याचे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत माहिती नसतील तर सावरकर चरित्र वाचून समजून घ्या.

       त्या राजकारणातल्या उडी वरून लक्षात आले अजून एक खूप मस्त आरोप त्यांच्यावर लावला जातो,
त्यांची जी उडी (समुद्रातील) आज जगप्रसिद्ध आहे.  त्यावर  काही लोक म्हणतात की त्यात काय 25 फर्लांग कोणीपण पूर्ण करू शकतो यावरूनच लक्षात येते की तुझा जन्म मस्करीतच  झाला असावा. त्या ऐतिहासिक उडी बद्दल थोडी स्पष्टीकरण देऊ इच्छितो . सावरकरांनी कोठून उडी मारली आहे वो? अर्थातच जहाजातून बरोबरच ना मग जहाज काही पाण्याला म्हणजेच समुद्रातील पाण्याला लागून चिटकून (सपाट)नसते हे माहिती असेलच . मग एवढं पण माहिती असेल की ,एखादी वस्तू पाण्यात जेवढे वरून टाकाल , तेवढीच ती खाली जाते.  नसेल माहिती तर प्रयोग करून पहा . दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैद्यांच्या संडासाला काही रिकामी खिडकी नसते किंवा तशा प्रकारचे साधन असते की ज्यातून सहजरीत्या बाहेर येता येईल त्यामुळे त्या खिडकीचा काच फोडून बाहेर यावे लागते व तिथे काही काच कापण्याचे यंत्र उपलब्ध नसते.  त्यामुळे फुटलेली काच हि काही सरळ पद्धतीने तुटणार नाही, ती ओबडधोबडच तुटणार यात काहीच शंका नाह.  बरं त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही की ती काच अंगाला थोडेफार खर्चंटणारच . बरं  उडी मारायची कशात तर खाऱ्या पाण्यात.  एक छोटा प्रयोग वरील प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी करून पहावा की घरी बसल्यावर सुईने एक टूचकी हाताच्या बोटाला मारावी व मिठाच्या पाण्यात बोट घालावे.  सुंदर अप्सरेचा स्पर्श झाल्यासारखे वाटते का ते पहावे?
       बरं अजून एक मुद्दा म्हणजे समुद्रात आपण एकटेच नाही आहोत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात. हे मी सांगायची गरज नाही त्यातील एखादे देव माशाचे पिल्लू,पिल्लू बरका समोरून स्वागताध्यक्ष म्हणून आले तर, तुमची मागून-पुढून पिवळी,अोली असे अनुक्रमे होणार यात काही शंका नाही त्यामुळे हा आरोप करताना थोडासा विचार करावा ही विनंती.!

Thursday, May 17, 2018

बालपण Via वृद्धाश्रम

बालपण Via वृद्धाश्रम


 

 आज काल एक नविनच Tread निर्माण झाला आहे तो म्हणजे आई वडील साधारणतः सत्तरीत गेली की सोडले त्यांना आश्रमात आणि मुले महिन्याला पैसेही पाठवतात अनं सुट्टीला बायका पोरांसकट चौपाटीवर भेळ खात बसणार बरोबर ना?   आता ह्या सगळ्या गोष्टी मध्ये दोन साम्य सगळ्यांच असत ते म्हणजे मुले आईवडिलांना शिव्या देतात ( अगदीच शब्दशः अर्थ नको ) व दुसरी गोष्ट मुले आम्हाला सांभाळत नाहीत असे उत्तर मी स्वतः ऐकले बरका ...
म्हणजे जेंव्हा जेंव्हा मी गावी जातो तेंव्हा काही कारणास्तव आमच्या इथे असलेल्या वृद्धाश्रमात जातो अगदी अवर्जुन नव्हे पण मनात आल की.ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच म्हणने प्रत्येक दाम्पत्याचे असते ते म्हणजे " मुले आम्हास सांभाळत नाहीत " तेंव्हा माझा अगदी लहान प्रश्न असतो तो आसा की," जेंव्हा ते लोक लहान होते तेव्हा तुम्ही भांडायचात का? "समोरचा अगदी हुशारीणे उत्तर द्यायचा की, "आता संसार म्हाटलं की भांडाणं आलीच की,तू अजून लहान आहेस तुला काय कळणार असे " हो मला मान्य आहे मी लहान आहे मला समजणार नाही हे सगळ पण एवढं मात्र मला कळतं की ते मोठे करतात त्याचच अनुकरण लहान मुले करतात. अगदी मी ही,माझे आईवडील जसे रहायचे तसाच मी रहायचो मग तुम्ही करत असलेल्या भांडणाचा प्रभाव देखील त्या मुलांच्या मनावर पडत असेल की कुठेना कुठे .
म्हणजे एक जन सहज भांडत भांडत समोरच्याच्या कानाखाली मारतो अन ते सर्व मुलगा पाहतो मग दुसऱ्या दिवशी मुलाचे शाळेत भांडण होते व त्याला कालचा प्रसंग आठवतो मग तो विचार करतो काल आपल्या वडिलांनी केले ते बरोबरच असणार व मुलगा समोरच्याची कानशीळ गरम करतो बरोबर का नाही ? बर वरून शिव्यांचा jackpot भेटणार ते वेगळच काहीस...पण हा विचार कधी डोक्यात येत नसेल का मुलं समोर आहेत नाही भांडायला पाहीजे आपण .

आता येवूयात शिव्यांच्या मुद्यावर काहींच म्हणन असही असत की आमची मुले आम्हाला मारतात.या ठिकाणी अवर्जून सांगाव वाटतं की कालच एक चलचिञफीत पाहीली म्हणजे मराठीत video. त्यात एक बाळ आईला म्हणत की तुला अक्कल नाही तु मुर्ख आहेस अश्या सगळ्या गोष्टी बरका.बर बाळा वय वर्ष लक्षात घेता त्याला हे पण माहीती नसत की आपण काय खाव अन काय नाही अश्या बाळाला तुम्ही शिव्या द्यायला शिकवता!अनं मोठे पणी हेच केल्यावर डोक्याला हात लावता पण तो पर्यंत वेळ गेलेली असते. मलाही मान्य आहे 21 शतक आहे प्रत्येक आई वडील त्यांच्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी साठवू ईच्छीता पण आश्या? म्हणजे, 'सोनू आता बाबा तुला मालणाल अन मग तू बाबाला माल हं...' म्हणजे पप्पा 70 चा झाला की सोनू एक लाथ मारतो आणि पप्पांची पोस्टींग डायरेक्ट आश्रमच बरोबर ना? मजा मस्ती करायला काहीच हरकत नाही अगदीच माझ्याही बाबतीत केलीच असणार पण असलं मारा मारी नाही .बरं जरी सांगीतल्या असल्या तरी आमच्या नशिबी आज्जी आजोबा असायचे लहाणपणी एकञ कुटुंब पद्धती असल्यामुळे.आता तर आज्जी आजोबा नुसते फोटोत मग मुलगा विचारणार आई कधी भेटणार ह्यांना मग आई म्हणनार जावू 4-5 वर्षांनी ते वैकुंठास गेल्यावर .
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे तरी चुक,म्हणजे 30% का होईना पण पालकांची पण आहेच ना?अर्थातच उर्वरीत 70% मुलांची पण आहे पण त्यांना लहाण पणा पासून जे शिकवलं तेच ते करणार ना ह्यात काही वाद मला दिसत नाही .
(वाचकांमधल्या सगळ्या पालकांची मी क्षमा मागतो अतिशय negative पद्धतीने तुम्हाला ईथे दर्शवीले पण वरील सर्व गोष्टींचा विचार कुठे तरी करायला हवाच ना?)

Sunday, May 13, 2018

लोकमान्य


लोकमान्य


सध्या चालू असलेला वाद म्हणजे लोकमान्य टिळक दहशतवादाचे जनक...
हो मलाही वाटते की टिळक दहशतवादाचे जनक आहेत परंतू कसे , कोणासाठी या सर्व गोष्टींचा थोडाफार विचार करायला नको का? तसेच ते कोणासाठी दहशतवादी आहेत याचा उल्लेख देखील राजस्थान सरकारने करायला नको का?याचा विचार आपण करायला हवाच.
माझ्या माहीती नुसार फाशीचा कलम अक्षरश: बदलायला भाग पाडले असे टिळक हे इंग्रजांसाठी दहशतवादीच म्हणावे लागेल ना. पण मग आपण नेमके चुकतो तरी कुठे?
ते इंग्रज हिंदुस्तानातून जावून आज जवळपास किती वर्षे झाली?तरी देखील आपण त्यांनी सांगीतलेल्या गोष्टींवरच विश्वास आज आपण ठेवतो हे बरोबर आहे का?याचा विचार आपण का करत नाही?
आता हिंदु संस्कृती नुसार गंगे मध्ये स्नान करणे म्हणजे इंग्रजांच्या मते एक धोतांडच तर त्यांच्या धर्मक्षेञांमध्ये असलेल्या टबात (पाण्याचा)जेंव्हा त्यांचा पुजारी एखाद्याला बुडवतो आणि म्हणतो की,तुझा आज पासून जुन्या आयुष्याशी काहीही संबंध नाही तु चांगला माणुस आज पासून आहेस.हे धोतांड नव्हे का?
विषयांतर नको व्हायला म्हणून परत एकदा टिळकांकडे वळतो.जे टिळक समजा सहज एका चौकात थांबून नुसते "आरे"म्हणले तरी इंग्लंड मध्ये ही बातमी जात असे आता ह्यास त्यांच्या मनातील दहशतच म्हणावे लागेल ना परंतू आजही आपण तेच करतो जे इंग्रजांना वाटत होते.
आता प्रश्न येतो तो म्हणजे टिळक हे प्रखरता वादी होते म्हणजे "ब्रिटीशांच्या पाया पडून काही स्वातंञ मिळणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता."असे काहीसे त्या पुस्तकात म्हटले आहे.ह्यात नेमक काय चुकलं तेच कळत नाही.जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा व वाचा त्यांचा त्यांचा स्वातंञ्य संग्राम व पहा कोणाला तरी भेटलय का न लढता,न प्राणं गमावता स्वातंञ्य कोणाला? आता स्वत:च्या हक्कासाठी हातात शस्ञ घेणे निव्वळ ह्या कारणामुळे जर तुम्ही आज पण टिळकांना दोषी ठरवत असाल तर ते आज ह्या हिंदुस्तानाचे दुर्देवच म्हणावे लागेल नव्हे का?

Note:-(सदर विचार हे आपलच खरं असे म्हणनाऱ्या किंवा बालबुद्धींच्या व्यक्तीस हानिकारक असू शकतात शक्यतो अश्या व्यक्तींनी विचार वाचू नयेत ही विनंती.🙏🏻)

"आठवणील पठाणकोट एअर फोर्स स्टेशन"

  31 डिसेंबर 2015 त्यादिवशीही एकीकडे संपूर्ण देश नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे एक मोठे संकट नवीन वर्षाच्या...