Ads

Monday, December 31, 2018

"आठवणील पठाणकोट एअर फोर्स स्टेशन"

 31 डिसेंबर 2015 त्यादिवशीही एकीकडे संपूर्ण देश नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे एक मोठे संकट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या पदरात पडणार होते. परंतु याचा काहीच मागोवा कोणालाच नव्हता असेच म्हणावे लागेल.
 भारतामधील पंजाब राज्यातील जानियाल गावामध्ये चार आतंकवादी भारतीय सीमेमध्ये येतात ते देखील भारतीय सैन्यदलाच्या गणवेशामध्ये. पुढे त्यांना एक टॅक्सी मिळते व ते त्यात बसून पुढील कामासाठी निघतात. काही काळानंतर त्या आतंकवाद यामधील एक आतंकवादी त्यांचा पाकिस्तानामध्ये बसलेल्या मोरक्या फोन करून संपर्क साधतात. त्या गाडीचालकाला कदाचित त्या आतंकवाद्यांचे मनसुबे कळाले असावेत बहुदा, म्हणून त्याने जाणूनबुजून आपल्या गाडीचा अपघात केला. पण झालेल्या सर्व प्रकारात त्या गाडी चालकास (एकागर सिंग) आपल्या प्राणास मुकावे लागले.
 थोड्या कालावधीनंतर ते आतंकवादी एका स्थानिक पोलिस अधिक्षकास व दोन नागरीकांस बंधक बणवतात व पुढील वाटचाल सुरू करतात.
 थोड्या वेळानंतर ते त्या गाडीला सोडून एका नागरीकाचा गळा कापून व बाकीच्या दोघांना तसेच सोडून पठाणकोट कडे निघतात.सुदैवाने जखमी असलेल्या ईसमाचे प्राण वाचले जातात.
 1 जानेवारी 2016 सकाळी पाच वाजता सगळे आतंकवादी पठाणकोट एअरबेजमध्ये प्रवेश करतात. हा सगळा प्रकार होत असताना सुरक्षा व्यवस्थेला काहीतरी गडबड असल्याचे कळते,तर दुसरीकडे बंधक असलेल्या पोलिस कर्मचारी झालेल्या सर्व प्रकारा बद्दलची माहीती संबंधीताना देतो.
घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल अजित देव म्हणतात की त्या वेळी फक्त 45मी.मध्ये एक योजना आखली गेली व अवघ्या 15मी.मध्ये ओजना कार्यंनवित झाली.

 त्याच वेळी प्रसंगावधान राखण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी भारतीय वायू सेनेचे सर्वात महत्वाचा भाग असलेल्या "गरुड कमांडो फोर्स" ला व तसेच "वेस्टर्न एअर कमांडोस" आणि NSG ला operatation करण्याची परवानगी दिली.

१ जानेवारी २०१६ ला रात्री ९ वाजून ४५ मी. सर्व टीम ला झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली व पशन चालू करण्याचे आदेश देण्यात आले .
रात्रीचा सहारा घेऊन आतंकवादी लपलेल्या डंप यार्ड मधून बाहेर आले पण,वायू सेनेच्या ड्रोन ने त्यांना पकडले व गरुड कमांडोची टीम तिथे लागलीच पोहचली.त्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे दोन जावान जखमी झाले व ते आतंकवादी तेथून पळ काढण्यात यशस्वी ठरले.

२ जानेवारी २०१६ सकाळी आतंकवादी वेगवेगळे होऊन अंदाधुंद गोळीबार करू लागले त्यामुळे अनेक जावान जखमी झाले तर काही मृत्युमुखी पडले.त्याचवेळी सुभेदार जगदीश चंद यांनी प्रसंगावधान राखून स्वतः नि:शस्त्र असताना एका आतंकवाद्याला पकडून ठार केले.झालेल्या सर्व प्रकारात त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
त्या नांतर उरलेले आतंकवादी लगतच्या जंगलात लपण्यासाठी गेले खरे पण भारतीय सैनिकांनी त्यांना त्या जंगलात चारही बाजूने घेरून ठेवले.अशीच स्थिती सकाळी १० वाजे पर्यंत होती म्हणजे जवळ पास ४ तास सैनिक कुठलीही हालचाल न करता त्या ठिकाणी नजर ठेऊन  होते.
आणि शेवटी सकाळी चकमकीस सुरुवात झाली, त्या मध्ये आतंकवादी असौल्ट रायफल,हॅन्ड ग्रेनेड चा वापर करत होते.
थोड्या वेळा नंतर एअर मार्शल यांच्या लक्षात आले कि जंगलातील झाड झुडुपांमुळे त्यांना ठार करण्यात अपयश येत आहे म्हणून त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणाजे "मी-३५" ची मदत घेण्याचा.मी-३५ च्या जोरदार हमल्यामुळे त्या आतंकवाद्यांना आपले ठिकाण अनावधानाने दाखवावे लागले .आणि त्या नंतर NGS च्या सर्व सेनिकांनी त्या आतंकवाद्यांनी ठार करणात यश मिळाले .ही चकमक सुमारे ४ वाजे पर्यंत चालू होती.

शेवटी ३ जानेवारी २०१६ ला ROV च्या मदतीने त्या आतंकवाद्यांच्या देहास बाहेर काढण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनी आपल्या शरीरात बॉम्ब वगैरे लावला असल्याची शक्यता होती.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो पर्याय चुकीचा ठरला ,आणि शेवटी भारतीय जवानांनी एक धाडसी निर्णय घेतला व ते स्वतः त्या ठिकाणी गेले.
त्या नंतर लेफ्ट.कर्नल.निरंजन व मेजर.त्यागी यांनी एक एक करून २ मृतदेह बाहेर काढले पण तिसऱ्या वेळेस त्या देहात असलेला हॅन्ड ग्रेनेड सक्रिय झाला व निरंजन यांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर त्यागी यांना गंभीर इजा झाली.
त्या नंतर संपूर्ण २००० ऐकर्स. ची संपूर्ण तपासणी केली.त्याच दरम्यान आजून दोन आतंकवादी एका घरात सापडले व NSG  च्या सैनिकांनी त्यांना manatol cocktel टाकून संपूर्ण घराला आग लावून दिली व सकाळी पूर्ण घराची तपासनी करण्यात आली.

आणि अखेर  ६ जानेवारी २०१६ ला चक्क ६ दिवसा नंतर "पठाणकोट ऐरबसे" ला सुरक्षित घोषित करण्यात आले.

भारत माता की जय.
वंदे मातरम्.
(लेख आवडल्यास नक्की share करा,like करा,आणि आजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास नक्की कळवा.काही चुका असतील त्या देखील कळवायला विसरू नका,व लेख कसा आहे ते comment box मध्ये नक्की कळवा.)
पोस्टमधील माहिती  संदर्भ :- History TV18 .
Images संदर्भ:- www.google.com

6 comments:

"आठवणील पठाणकोट एअर फोर्स स्टेशन"

  31 डिसेंबर 2015 त्यादिवशीही एकीकडे संपूर्ण देश नवीन इंग्रजी वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे एक मोठे संकट नवीन वर्षाच्या...